गांजा बाळगणाऱ्या दोघांना पकडले आहे..
गांजा बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात पकडले. त्यांच्याकडून साडेसात हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

पुणे : गांजा बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात पकडले. त्यांच्याकडून साडेसात हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. समाधान केदा पवार (वय ३३, रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात पादचाऱ्यांकडील मोबाइल चोरुन नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
दागिने, तसेच मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. पवार आणि खैरनार छत्रपती शिवाजी रस्त्यावर आले होते. दोघांकडे गांजा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुजय रिसबुड यांना मिळाली. राष्ट्रभूषण चौक परिसरात सांपळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून साडेसात हजार रुपयांचा ८२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, विठ्ठल साळुंके, शुभम देसाई, सुजय रिसबुड, रफीक मुल्ला, महेश कुंदे, शशी गाडे, अजित शिंदे यांनी ही कारवाई केली.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




