महिलेचा विनयभंग करणा-यास अटक करून, ४८ तासात दोषारोप पत्र केले दाखल..!

दोषारोप पत्र केले दाखल
यातील फिर्यादी पिडीता यांनी नमुद इसम याचेसोबत राहण्यास नकार दिल्याचे कारणाने, त्याचा राग मनात धरुन फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करुन येण्या-जाण्याचा मार्ग अडवुन, हात पकडून तिचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याने त्याचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६९९/२०२५ भा.न्या.सं. कलम ७४,७८ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास म. सहा. पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, यांचेकडे देण्यात आला होता. तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यातील आरोपी सुमीत पांडुरंग चाबुकस्वार वय ३६ वर्षे रा. मुंढवा, पुणे यास ताब्यात घेण्यात आले. तसेच निर्भया फिर्यादी यांचा मा. न्यायालयात बी.एन.एस.एस. १८३ प्रमाणे जबाब नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे अनुषंगाने साक्षीदार लोकांकडे तपास करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच गुन्ह्याचे पुरावेकामी आरोपीने वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचे अनुषंगाने ई-साक्ष प्रणालीद्वारे तांत्रिक पुरावा गोळा करून दिनांक ३१/०७/२०२५ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर न्यायालय, पुणे शहर येथे ४८ तासाच्या आत आरोपी विरूध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त परि ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशनचे श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, यांचे सुचनांप्रमाणे म. सहाय्यक पोलीस निरीक्षक, हसीना शिकलगार, पोलीस अंमलदार विनोद शिर्क यांचे पथकाने केली.




