मित्रांनीच मैत्रिणींचे न्यूड फोटो केले व्हायरल, पुण्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रताप

पुणे – पुण्यातील हडपसर मधल्या एका नामांकित शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतापामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या वर्गातील मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहावीच्या वर्गातील हे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत एका पिडीत मुलीच्या ३६ वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी हडपसरमधील एका इंग्रजी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. दरम्यान, ही मुलंदेखील या मुलीच्याच वर्गातील आहेत. तत्पुर्वी त्यांच्या काही मित्र व मैत्रिणींच्या सोशल मिडीयावरील खात्यावर त्यांचे अश्लील फोटो पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. फोटो व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. पिडीत मुलींनी याची माहिती कुटूंबियांना दिली. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. चार मुलींचे फोटो मॉर्फ केले होते. मॉर्फद्वारे नग्न अवस्थेतील फोटो तयार केले होते.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी प्राथमिक तपासात हे फोटो १६ वर्षाच्या मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये टेलिग्रॅम बॉट या अ‍ॅपद्वारे हे फोटो तयार केल्याचे समोर आले. तर, चौकशीत दुसऱ्या दोघांनी ते व्हायरल केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तिघा मुलांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page