अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही; गुलाबराव पाटलांचा अजित पवारांच्या खात्यावर निशाणा

जळगाव : अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह शेरा मारून यायची. मात्र पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले, अशा शब्दात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

Advertisement

पाटील यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार यावेळी कथन केला. ‘आमची फाईल १० वेळा अर्थ विभागाकडे गेली. पण मी पण पक्का आहे. खात्यात फाईल गेली की मी माणूस पाठवायचो. शेख वहा जा के देख क्या चल रहा है. शेख तू आगे का देख. मे तेरे पिछे है, असं त्याला सांगायचो. तिथे जाऊन आमची फाईल निगेटिव्ह होऊन व्हायची. पण मी पिच्छा सोडला नाही. आमच्या लोकांनी पिच्छा सोडला नाही. जर हे पाच-सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर मीही माझ्या कामाच्या व्यापात दुर्लक्ष केलं असतं. सतत फॉलो अप घेणारा माणूस असला की काम होतं,’ असा घटनाक्रम त्यांनी सांगितला.

ते पुढे म्हणाले, तुम्ही आज माझ्या सत्कार सन्मानसाठी जी शाल दिली. तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. कॅबिनेटमध्ये वर्णी लागत असल्याने मी समाधानी होतो. असं मतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page