खुन, मोका व बलात्कारातील मागील दोन वर्षापासुन फरार आरोपीस अटक..!

यातील फिर्यादी यांना आरोपी नामे विशाल लक्ष्मण भोले वय ३२ वर्षे रा. दुष्काळ झोपडपट्टी, रामभवन प्रोव्हिजन स्टोअर्स जवळ, १३ ताडीवाला रोड, पुणे याचे लग्न झालेले असतानाही त्याचे लग्न झाले नसल्याचे फिर्यादी यांना खोटे सांगुन, त्यांचेसोबत लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार फिर्यादी यांचे इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवुन आरोपी यास लग्नाबाबत विचारपूस केली असता आरोपी याने पिडीत फिर्यादी यांना मारहाण, शिवीगाळ, व जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणुन बंडगार्डन पो.स्टे. गु.र.न. २००/२०२३ भादंवि कलम ३७६ (२) (एन), ३१३, ३२३,४१७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील आरोपी नामे विशाल लक्ष्मण भोले वय ३२ वर्षे रा. सदर याचे विरुध्द शिवाजीनगर पो.स्टे. गु.र.नं. १७१/२०२३ भादवि कलम ३०२,१४१,१४२,१४३,१४४,१४५,१४७,१४८,१४९,१२० (ब) सह. भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३),१३५ अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक)) अधि.१९८९ चे कलम ३ (१) (आर), ३ (२) (व्हि.ए.).३ (२) (व्हि) व ६ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. सन १९९९ चे कलम ३ (१).३ (२) ३ (४), आर्म अॅक्ट ३ (२५) अन्वये हा गुन्हा घडले पासुन फरार झालेला होता. सदर आरोपीचा मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर श्री. मिलिंद मोहिते, यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार बडे, मनिष संकपाळ, भोकर, यांनी वर नमुद आरोपीस ताब्यात घेवुन बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २००/२०२३ भादंवि कलम ३७६ (२) (एन), ३१३,३२३,४१७,५०४,५०६ या दाखल गुन्हात दि.३१/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, अमित सस्ते, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, शिवाजी राणे यांचे पथकाने केली.




