ऐन दिवाळीत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र महागाईची झळ सर्वसामन्यांना बसत आहे. अशात दिवाळीच्या दिवसातच आणखी एक झटका नागरिकांना बसला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ झाली आहे.

1 नोव्हेंबर 2024पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑइलने एक नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.

Advertisement

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसै थे

आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणातच बदल झालेला नाहीये. व्यावसायिक एलपीजी गॅसे सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट्समधील जेवणाचे दर वाढू शकतात.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page