रेकॉर्ड वरील आरोपीला अग्निशस्त्रासह केले जेरबंद..!

नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे हद्दीत पोलीस अंमलदार बंटी मोरे व स्वप्नील मगर हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे सार्थक भगत रा. कोल्हेवाडी याचेकडे अग्निशस्त्र आहे व तो कोल्हेवाडी बस स्टॉप येथे थांबलेला आहे. अनुषंगाने वरिष्ठांचे परवानगीने सहा. पो. निरीक्षक राहुल यादव व पोलीस अंमलदार यांनी बातमीच्या अनुषंगाने कोल्हेवाडी बस स्टॉप येथे सापळा रचुन आरोपी नामे सार्थक बाळासाहेब भगत वय २२ वर्षे, रा. कोल्हेवाडी फाटा, सिंहगड रोड पुणे यास ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ३५,५००/-रु. किं.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आल्याने नांदेडसिटी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५५/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), म.पो.का. कलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी हवेली पोलीस स्टेशन येथे शरीराविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे, श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page