खडक पोलीस ठाण्याची वाहन चालकांवर धडक कारवाई

खडक पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांनी वाहन चालक विरोधात कारवाईची मोहीम राबवण्यात आली.

सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी वाहनचालक यांचे विरोधात मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून एकूण रू.39,500 दंड आकारण्यात आलेला आहे पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करताना विनापरवाना वाहनधारक,इन्शुरन्स पूर्ण नसलेली वाहन,ट्रिपल सीट वाहने, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणारे ,सिग्नल जम्पिंग करणारी वाहन चालक ,वाहन चालवणारी अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात वर. नमूद प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून कारवाईदरम्यान वाहन चालवणारी अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांनी वाहन चालवण्यास दिल्याने त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलिसांनी बोलावून त्यांना अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्याची देऊ नका, तसेच सदर वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता असल्याने सदर बाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच वाहनचालक यांना हेल्मेटच्या वापराबाबत सूचना देण्यात आले आहेत मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी रस्त्यावर अपघात कमी व्हावेत याबाबत वाहतुकीच्या चिन्हांचा वापर करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच इथून पुढे वाहन कायद्याचे नियमांचा अभंग केल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याबाबत ही नागरिकांना सुचित करण्यात आले आहे.

Advertisement

सदर कारवाई संदीप सिंह गिल्ल पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली फराक खाना विभागाचे सहा पोलीस आयुक्त श्री अशोक धुमाळे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील माने पोलीस निरीक्षक श्री. संपतराव राऊत पोलीस निरीक्षक श्री.विनय पाटणकर व खडक पोलीस ठाणे अधिकारी व वाहतूक विभागाचे अंमलदार हजर होते.

वार्ताहार

जन हक्क टाइम्स पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page