१०२.९१ ग्रॅम मेफेड्रॉन व १०२.३८ ग्रॅम डोडा चुरा बाळगणा-या दोन इसमांकडुन एकुण २१,१३,७४८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

दि.१५/०५/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे चक्रधर निवास, लेन नं. १, सिद्धार्थनगर, जकात नाक्याजवळ, धानोरी पुणे येथे आरोपीचे राहते घरी छापा कारवाई केली असता इसम नामे १) करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित, वय ४१ वर्षे, रा. चक्रधर निवास, लेन नं. १, सिद्धार्थनगर, जकात नाक्याजवळ, धानोरी, पुणे, मुळ रा. गाव-दुरासणी, तहसिल सौजत, जि.पाली, राज्य- राजस्थान. २) राजुसिंह सहदेवसिंह राजपुरोहित वय ४२ वर्षे, रा. सुखसागरनगर, पुणे मुळ रा. नौरवा गाव, तहसिल आहोर, जि. जालोर, राज्य-राजस्थान यांच्या ताब्यात १०२.९१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १०२.३८ ग्रॅम डोडा चुरा हा अंमली पदार्थ, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, इलेक्ट्रीक वजनकाटा असा एकुण २१,१३,७४८/- रू कि. चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर आरोपींविरुध्द विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३२/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), १७ (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर, अतिरिक्त कार्यभार (गुन्हे), श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ३, श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ श्री. पंडीत रेजितवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस अंमलदार राजस शेख, योगेश कुंभार, सतिश चव्हाण, प्रशांत कळसकर, शरद धांडे, अमोल सोनवणे, संदीप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड महिला पोलीस अंमलदार सुकेशिनी आंबले, सुरेखा साबळे आरती दिवेकर तसेच वैशाली माकडी यांनी केली आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page