पोतं उचलायला म्हणून नेले अन्…; पुण्यात तरुणाच्या डोक्यात कोयता मारून हत्या

पुणे – पुण्यात हत्यासत्र सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात चार जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटना ताज्या असतांना उत्तमनगर येथे चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून एकाने एका तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर बोलावून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय २२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे या तरुणाचे नाव आहे. तर, अमित सुदाम गुजर (वय २१, रा. सदर) याला अटक केली आहे. याप्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, जयदीप रविवारी दुपारी घरात झोपलेला होता. तेव्हा अमित त्याच्या घरी आला, त्याने ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे माझ्या सोबत चल’ असे म्हणला. तो जयदीपला घराबाहेर घेऊन गेला. नंतर १५ ते २० मिनिटांनी भोंडेकर यांच्या घराबाहेर लोकांचा ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा जयदीपच्या डोक्यात कोयता मारल्याचे दिसून आले. लगेच लक्ष्मी भोंडेकर या जयदीपच्या मित्रांसोबत जुनी मासे आळीतील त्याच्या घराजवळ गेल्या. जयदीप हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यात कोयता अडकला होता. जयदीपला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. दरम्यान, जयदीपच्या डोक्यात अमितने कोयता मारल्याचे त्याच्या आईला सांगितले. जयदीपवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, सोमवारी (दि. 8) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page