पुणे पोलिसांची अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई..!

.पुणे पोलिसांची अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई.
.जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ भट्टी मध्ये जळून नाश करण्यात येणार आहे.

दि.२५/०३/२०२५ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील ९ पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील एकुण ५७ एन.डी.पी.एस. गुन्हयातील जप्त करण्यात आलेला गांजा, एम.डी.,. इफेड्रीन, कोकेन, एल.एस.डी., चरस, अफिम पॉपीस्ट्रॉ, हेरॉईन व गांजा मिश्रीत बंटा गोळी असे सर्व मिळुन अंदाजे किं.रु.७,७६,०१,२३६ /- चा एकुण ७८८ किलो ९५४ ग्रॅम ०६३ मि.ग्रॅम वजनाचे सिलबंद अंमली पदार्थ मुद्देमालाची नाश प्रक्रिया ड्रग डिस्पोजल कमिटी यांचे समक्ष Maharashtra Enviro Power Itd, Plot no. P-56, Ranjangao MIDC, Tal-Shirur Dist- Pune येथील भट्टीमध्ये जाळुन नाश करण्यात येणार आहे.

Advertisement

तत्पूर्वी, नाश करण्यात येणारे मुद्देमालाचे वजन व परिक्षण, मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली दि.२५/०१३/२०२५ रोजी रिक्रेशन हॉल, पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे ड्रग डिस्पोजल कमिटी १) अध्यक्ष मा.श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे २) सदस्य- मा.श्री. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे व ३) सदस्य मा.श्री. संदिप भाजीभाखरे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, पुणे यांचे उपस्थितीत आयोजित केलेले आहे. सदरची प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी, याकरिता सर्व नाश करण्यात येणारे मुद्देमालाचे परिक्षणाकरिता एफ.एस.एल. कडील Asst. Chemical Analyzer, Regional Forensic Science Laboratory, Pune तसेच राज्य उप्तादन शुल्क येथिल अधिकारी पंच म्हणुन नेमण्यात आलेले आहे व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, पुणे येथील अधिकारी तसेच सरकारी फोटोग्राफर/व्हिडीओग्राफर देखील नियमानुसार उपस्थित आहेत.

त्याकामी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हेशाखा, पुणे चे श्री. उल्हास कदम, पोलीस निरीक्षक तसेच श्री. सुजित वाडेकर, सहा. पोलीस उप निरीक्षक तसेच स्टाफ यांनी पाठपुरावा केलेला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page