विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडुन घरफोडी व वाहन चोरी असे ०२ गुन्हे आणले उघडकीस..!

दि.२१/०२/२०२५ रोजी वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शन प्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पथका कडील पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, अकबर शेख व उमाकांत स्वामी असे हडपसर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत फिरत असताना पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड व अकबर शेख यांना मिळालेल्या बातमीवरुन त्यांनी एका विधी संघर्षात बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन सदर विधी संघर्षीत बालकांकडून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.२१९/२०२५ भा.न्या.सं. कलम. ३३१(३) ३०५ हा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील चोरीस गेलेले एकुण ७६,०००/- रु.चे सोन्याचे दागिने तसेच सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं.५५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) या गुन्हयातील मोटर सायकल जप्त करुन एकुण ०२ मालाविरुध्दचे गुन्हे अल्प कालावधीमध्ये उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ चे पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, अकबर शेख व उमाकांत स्वामी यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page