बिबवेवाडी पोलीसांनी सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी वाहने जप्त केली..!

सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. ११/०२/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वा. ते ०८.३० वा. दरम्यान शिवतेज गनर, शेळकेवाडा पद्मावती मंदिर जवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे येथून एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जिचा आर.टी.ओ. क्र. एम.एच. १२ के.बी. १५८६ मोटारसायकल लॉक व पार्क करुन ठेवली केली असता ती अज्ञात इसमाने चोरुन नेली असलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, परि. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.भुवड, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार रक्षित काळे, ज्योतिष काळे व अभिषेक धुमाळ यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी अर्जुन हिराजी भोसले, वय २० वर्षे, रा. सुवर्णयुग मित्र मुडळ जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे. यास दिनांक १९/०२/२०२५ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने मौज मजेसाठी व पैश्यासाठी चोरलेबाबत सांगितले असून दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३ (२), २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ४३/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अशी एकूण १,०५,०००/-कि.रू.ची, एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, एक बजाज ऑटो लिमीटेड कंपनीची के.टी.एम. ड्युक मोटार सायकल एक सुझुकी कंपनीची अॅक्सीस दुचाकी मोपेड अशा तिन मोटर सायकल तसेच एक हिरो एच. एफ. डिलक्स गाडी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. हिरो एच.एफ. डिलक्स गाडीमालकाचा शोध घेवून अधिक तपास करत आहोत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास परि. पोलीस उपनिरीक्षक, ए. बी. भुवड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, परि. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.भुवड, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, रक्षित काळे, अभिषेक धुमाळ, बसवणप्पा गजा, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.
(शंकर साळुंखे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पो.स्टे. पुणे शहर




