हरविलेले / गहाळ झालेले एकूण ११९ मोबाईल फोन त्यांच्या मुळ मालकांना केले परत..!


दिनांक २१.११.२०२५ रोजी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर यांच्या वतीने हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रमा अंतर्गत नेताजी मंगल कार्यालय, हडपसर पुणे या ठिकाणी उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पाडला. हा उपक्रम नागरिक आणि पोलीस दल यांच्यातील विश्वासाची कडी निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रमाची प्रस्तावना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, यांनी केली. त्यानंतर मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे, यांनी सी.ई.आय. आर प्रणाली कशी कार्य करते, हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीसांकडून वापर केल्या जाणा-या तांत्रिक पध्दतींचा वापर याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली तसेच यांच्या हस्ते १७१ मोबाईल परत करण्यात आले. त्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशन कडील ११९ मोबाईल यांचा समावेश होता.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्रीमती अनुराधा उदमले, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई यांचे मागदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोनि. (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, सायबर विभागाचे पोलीस उप-निरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार संदीप राठोड, बापु लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर, समीर पांडुळे, प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके व महाविर लोंढे केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page