महायुतीच्या उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद; शरद पवार यांचा गंभीर आरोप

बारामती : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाने थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात एबी अर्ज पाठवून राष्ट्रवादी अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला. देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरीतून धनराज महाले यांनी शिंदे गटाच्या वतीने अर्ज दाखल करुन अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर आरोप केलाय.

शरद पवारांचा गंभीर आरोप

Advertisement

या प्रकारावरून शरद पवारांनी गंभीर आरोप केलाय. शिवसेना उमेदवारांचे एबी फॉर्म हे विमानाने पोहोचवण्यात आले. यापूर्वी असे घडले आहेत का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले की, असा अनेक गोष्टी घडत आहेत. या सरकारचे वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॉर्म पाठवला. आम्ही अनेक जिल्ह्यांमधून ऐकत आहोत, काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती असती तर मी याबाबत वाटेल ते केले असते. मात्र माझा स्वभाव आहे की, पूर्ण माहितीशिवाय मी भाष्य करत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page