ओटीपी शेअर केल्यामुळे नागरिकांमध्ये फसवणुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांकडून सावधानतेचा इशारा सावधानतेचा इशारा
खडक पोलीस स्टेशन पुणे शहर येथील सायबर तक्रारी अर्जदार सुरज दिलीप गोवळकर स्थानिक अर्ज क्र. 374/2023 दि.17/05/2023 यांचे क्रेडिट कार्ड वर इन्शुरन्स चालु आहे इन्शुरन्स कॅन्सल करण्याकरिता ओटीपी शेअर करून 36909/- रू. फ्रौड झाले बाबत अर्ज प्राप्त झाला होता सदर अर्जाचे अनुषंगाने योग्य ते बँकेला व Dreamplug,cred card मर्चंट बँकेला पत्रव्यवहार करुन सदर पूर्ण 36909/- रूपये पैसे परत करून देण्यात यश प्राप्त झाले आहे.
अर्जदार यांनी केलेल्या कामगिरी बद्दल आभार व्यक्त केले आहेत.
सदरची कामगिरी मा. वपोनि सौ संगीता यादव मॅडम व पोनि गुन्हे राऊत सर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवणे, पो. शि 10318 दराडे,पो. शि. 5163 नदाफ, पो. शि.701 दिवटे, म पो. ना.9504 कडूसकर यांनी केलेली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर
Advertisement
लोकप्रतिनिधी जन हक्क टाइम्स पुणे
Advertisement




