पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाची सहा वाहनांना धडक; महिलेचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कर्वे रस्त्यावर मद्यधुंद टेम्पो चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला. गीतांजली अमराळे (वय ३५, रा. शास्त्रीनगर) असे या महिलेचे नाव असून, त्यांचे पती श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक आशिष पवार याला अटक केली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील करिश्मा चौकाकडून पौडच्या दिशेने हा टेम्पो जात होता. भरधाव असलेल्या या टेम्पोने करिश्मा चौकाजवळ प्रथम एका वाहनाला धडक दिली. त्यावेळी तेथील बाल तरुण मंडळातील कार्यकर्ते आरती करत होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि धाव घेतली. मात्र, टेम्पो अपघात होऊन देखील थांबला नाही. तो तशाच वेगात पुढे गेला. नंतर टेम्पोने सिग्नलला थांबलेल्या रिक्षा, चारचाकी, दोन ते तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. पौड फाटा चौकात दुचाकीस्वार श्रीकांत अमराळे कर्वे रस्त्याकडे वळण घेत असतानाच या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पाठिमागे बसलेल्या पत्नी गीतांजली अमराळे या गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लागलीच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यात गंभीर मार लागल्याने गीतांजली यांचा मृत्यू झाला.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page