अजित पवारांना धक्का?; आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवार यांची भेट

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

याबाबत शरद पवार म्हणाले, ‘‘आमदार अतुल बेनके यांचे वडील स्व. वल्लभशेठ हे माझे मित्र होते. आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली यात नवीन काय आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाचे काम केले. त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे.’’

अतुल बेनके काय म्हणाले?

Advertisement

ज्येष्ठ नेते पवार साहेब व आमच्या कुटुंबात चाळीस वर्षे ऋणानुबंध आहेत. त्यांना पहात मी लहानचा मोठा झालो आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांची भेट घेतली. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आमच्यात पाऊस, पाणी, शेती बाबत चर्चा झाली. जनतेने मला विकास कामासाठी निवडून दिले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे. विधानसभा निवडणुकीला दीड ते दोन महिन्याचा अवधी आहे. असं अतुल बेनके म्हणाले.

भेटीबद्दल आमदार बेनकेंना विचारा : अजित पवार

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अतुल बेनके राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीवर अजितदादांनी भाष्य केले आहे. अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने काय झाले? अनेक आमदार माझी सुद्धा भेट घेतात. प्रसारमाध्यमांना बातम्या नसल्याने याची भेट घेतली, त्याची भेट घेतल्याचे वृत्त दाखविले जाते. त्यामुळे भेटीबद्दल आमदार बेनके यांना विचारा, असे अजितदादांनी म्हटले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page