प्रेम संबंधाच्‍या कारणावरून तिघांनी केला तरुणाचा खून; पुणे जिल्ह्यातील घटनेमुळे खळबळ

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिघांनी मिळून एका तरुणाचा खाणीत ढकलून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. देहूरोड येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला.

अजय जोगिंदर लुक्कड (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल चंदू सकट (वय १८), प्रेम सचिन मोरे (वय १९) व ओंकार उर्फ गणेश रवींद्र पवार यांना अटक केली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूरोड-कात्रज बायपास रोडवर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खानीमध्ये शुक्रवारी (दि. २०) सकाळी एका तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अजय लुक्कड हा तरुण मृतावस्थेत आढळून आला. अजय लुक्कड याचा खून केल्याची शक्यता लक्षात घेत देहूरोड पोलिसांनी तपास केला. काही वेळेत पोलिसांनी तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले.

अजयचे एका आरोपीच्‍या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. त्या कारणावरून त्‍या तिघांनी मिळून अजय याला देहूरोड पोलीस ठाण्याजवळील खानीजवळ बोलावून घेतले. तिथून आरोपींनी अजयला खानीत ढकलून दिले. त्यामध्ये अजयचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page