बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांची तक्रार

पुणे – सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी एकावर कोंढावा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अझहर तांबोळी आणि साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनुसया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हडपसर विधानसभा मतदार संघातून जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत. अझहर तांबोळी आणि साथीदारांनी जगताप यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. तांबोळी आणि साथीदारांनी दिशाभूल करणारा मॅसेज व्हायरल केल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बेंद्रे तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




