वाघोली अपघात प्रकरणात डंपरच्या मालक अटकेत..!

पुणे, नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली आहे. त्याने निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली आहे.
अनिल काटे (३९) असे अटक करण्यात आलेलया डपर मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली चौकात भरधाव डंपर चालकाने मध्याच्या नशेत फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडले होते. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झालेले आहेत. यात एक तरुणी गंभीर असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

Advertisement

पोलिसांनी अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीस बोलविले होते. तपासात अनिल काटे याला डंपर चालकाला दारू पिण्याच व्यसन होते हे माहिती होते. जेव्हा डंपर चालक डंपर घेऊन चालला होता तेव्हा काटे याला याबाबत माहिती होती. तसेच चालकाने डंपर मधील माल आव्हाळवाडी येथे उतरवला होता. तपासात काटे याने चालकाने डंपर घेऊन जाताना दारू पिली होती का नव्हती याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले.
यामध्ये पोलिसांनी सांगितले की, एकतर मालकाने मद्यपी डंपर चालकाला गाडी चालविण्यासाठी द्यायला नको होती. तसेच त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्य प्राषण करून गाडी चालवयची नाही असेही नोकरीवर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षीत होते. त्यामुळे याप्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page