वडगाव शेरीत चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण; अज्ञातावर गुन्हा दाखल

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश करून वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा दिल्यावरून माजी नगरसेविका रेखा टिंगेर यांचे पती चंद्रकांत यांना मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी दोन अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या कारवर सिमेंटच्या विटा मारून काचा फोडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी रेखा (वय ५२, रा. कमल निवास, भैरवनगर, धानोरी ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

माझे पती चंद्रकांत टिंगरे यांनी आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार गटात प्रवेश केला. वडगाव शेरीतील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा दिल्याने विरोधक आमच्यावर चिडून होते. चंद्रकांत टिंगरे हे मंगळवारी दुपारी धानोरी भागातून निघाले होते. तेव्हा दोघांनी कार अडविली. कारवर दगडफेक करुन पती चंद्रकांत यांना मारहाण केली, असे रेखा टिंगरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page