चोर्‍या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या बातम्या उघडकीस येत आहेत. यामुळे पोलिसही अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातचं आता पुणे शहरात जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी पिस्तूलासह जेरबंद केले आहे. या सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. रफिक सलीम खान (वय ३६, रा. जिवलग हौसिंग सोसायटी, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

शास्त्री रोड येथून रस्त्याने जाणार्‍या पादचारी वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस करत होते. तपासात रफिक खान याने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकातील अमंलदार सचिन कदम यांना आरोपी रफिक खानबाबत माहिती मिळाली. त्याला पकडले. दरम्यान, रफिक राहत असलेल्या पत्त्यावर गुन्ह्यातील सोनसाखळी हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. राहत्या घरी सोन साखळीचा शोध घेतला जात असताना पोलिसांना घरात देशी बनावटीची दोन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे मिळाले. त्यासोब तच गुन्ह्यातील चोरीला गेलेली सोनसाखळी देखील सापडली. पोलीस त्याच्याकडे सखोल तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page