अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक; अडीच लाखांचा गांजा जप्त

पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त केला आहे. मोबीन अब्दुल रशीद शेख (वय ३७, रा. सदर बाजार, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी व त्यांचे सहकारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजिम शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा येथे एक जण गांजा विक्रीकरीता येणार आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक घटनास्थळी गेले.
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोबीन शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांचा १२ किलो गांजा आणि मोबाईल असा अडीच लाखांचा माल जप्त केला. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक रामकृषण दळवी, पोलीस उपनिरीक्षक घुले, पोलीस अंमलदार साहिल शेख, अजीम शेख, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, संदीप जाधव, नितीन जगदाळे, निलम पाटील यांनी केली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




