मोबाईल स्नॅचिंग करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केली अटक..!

दि.०४/०१/२०२६ रोजी २२/३० वा.चे दरम्यान जे.एम. रोड, जंगली महाराज मंदिरासमोर, शिवाजीनगर येथे फिर्यादी हे कॅबची वाट पाहत उभे असताना अचानक एका दुचाकीवरील दोन इसमांन पैकी एकाने फिर्यादी यांचे हातामधील किं. रु.७०,०००/- चा सॅमसंग कंपनीचा एस-२५ अल्ट्रा मोबाईल फोन हा हिसकावुन घेऊन पळुन गेले होते. त्याप्रमाणे दि.०५/०१/२०२६ रोजी फिर्यादी यांचे तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमांविरुध्द शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०६/२०२६ भा.न्या.सं.क. ३०४ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचा युनिट १, गुन्हे शाखा मार्फतीने समांतर तपास करीत असताना घटनास्थळाजवळील मिळालेल्या सीसीटी व्हि फुटेजच्या आधारे युनिट १ कडील पोलीस अंमलदार डोंगरे व युवराज कांबळे यांना त्यांचे बामतीदारामार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हयातील फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावुन नेणारा आरोपी हा शिवाजीनगर पाटील इस्टेट भागात राहण्यास असुन तो रात्री उशिरा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्म नंबर २ कडील सिमा भिंती जवळील पार्किंगमध्ये येणार आहे. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अजित जाधव युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन देवुन सदर ठिकाणी सापळा रचन्यास सांगितले असता युनिट १ कडील पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे व पोलीस अंमलदार असे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्म नंबर २ कडील सिमा भिंती जवळील पार्किंगमध्ये रात्री सापळा रचुन थांबले असता काही वेळातच सदर ठिकाणी मिळालेल्या बातमीतील इसम हा आला असता त्यास वर नमुद पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी अतिशय शिताफीने पकडुन त्याला त्याचे नाव व पता विचारला असता त्यांने त्याचे नाव राकेश गोवर्धन वाघीरे, वय २५ वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, प्लॉट नं.०८, गल्ली नं.०१, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे असे सांगितले. नमुद आरोपीची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन ७०,०००/- रु.किं चा एक सॅमसंग

Advertisement

कंपनीचा मोबाईल व ६५,०००/-रु. किं.ची होंडा अॅक्टीवा मोपेड तिचा तिचे पुढच्या बाजुचे हेड लाईट व त्याखालील फ्रंट गार्ड नसलेले असा ऐवज मिळुन आल्याने त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा मोबाईल हा त्याने व त्याचा साथीदाराने मिळुन जंगली महाराज मंदिरासमोर, शिवाजीनगर येथे उभा असलेल्या एका इसमांच्या हातातुन हिसकावुन चोरी केला असल्याचे कबुल केले. त्यास पुढील अधिक तपासकामी शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) पुणे शहर. श्री निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, श्रेणी. पोलीस उप निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व संदेश काकडे यांचे पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page