नवले पुलाजवळ ट्रकची क्रेनला धडक, एकाचा जागीच मृत्यू

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात ब्रेक निकामी झालेला ट्रकने क्रेनला धडक दिली. अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकमधील मदतनीस गंभीर जखमी झाला. सलीम मकबूल शेख (वय ५८, रा. उमरगा, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अपघातात ट्रकमधील मदतनीस (क्लिनर) समीर आयुब मोमीन हा जखमी झाले आहेत.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरुन कात्रजकडून नवले पुलाकडे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ट्रक (क्रमांक – एमएच २५ एजे १००५) निघाला होता. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रकचालक सलीम शेख यांनी ट्रक सेवा रस्त्यावर नेला. सेवा रस्त्यावर थांबलेल्या क्रेनवर ट्रक आदळला. गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा जागीच मृत्यू झाला. मदतनीस समीर केबीनमध्ये अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. केबीनध्ये अडकलेले मदतनीस समीर यांची जवानांनी सुटका केली. कटरच्या सहाय्याने त्यांना केबीनमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर काही वेळ सेवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page