चैन चोरून पळून जाणाऱ्या चोरास केले जेरबंद, मुद्देमाल केला जप्त …..
चेन चोरून पळून जाणाऱ्या चोरास केले जेरबंद, मुद्देमाल केला जप्त …..
चोरीचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी आव्हानात्मक होत चालले आहे.
दिनांक १६/०५/२०२३ रोजी दुपारी ०३.३० वा चे सुमारास महिला नामे डॉ. अर्णिका अखिलेश सिंग वय २९ वर्षे, रा . शांतीनगर सोसायटी, गुरुवार पेठ पुणे या पायी चालत घरी जात असताना एका चोरट्या इसमाने त्यांच्या गळ्यातील चैन जबरीने चोरून तेथून पळ काढला . त्यावेळी त्या मदती साठी ओरडल्या असता घोरपडे पेठ येथे क्रिकेट खेळत असलेले स्थानिक तरुण गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे , उमेश काशीद
अभिषेक दिगंबर जाधव यांनी पळून जाणाऱ्या चोरास पाठलाग करून पकडले व घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचलेल्या पो नि राऊत ( गुन्हे ) व पथकाच्या ताब्यात दिले . त्याचे कडून चोरी केलेली चैन जप्त करण्यात आली आहे . या घटने बाबत खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५९/२०२३ कलम ३९२ भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नामे महेश लक्ष्मण सावंत रा. थेरगाव, वाकड पुणे यास अटक करण्यात आली आहे व पुढील तपास स पो नि जाधव हे करीत आहेत .
चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपीस मोठ्या धाडसाने पकडणारे स्थानिक तरुण नागरिक गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे , उमेश काशीद, अभिषेक दिगंबर जाधव यांनि दाखवलेल्या तत्परतेबाबत व धाडसाबाबत श्री. सतीश गोवेकर, सहायक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग व संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,खडक पोलीस स्टेशन यांनी या तरुणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले .
तसेच या निमित्ताने नागरिकांनी देखील अशा प्रकारे धाडस दाखवून मदतीला पुढे यावे असे आवाहन खडक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे .
( संगीता यादव )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खडक पोलीस स्टेशन पुणे,
प्रतिनिधी
जन हक्क टाइम्स
पुणे




