बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक अत्याचार प्रकरण; नराधमांचे रेखाचित्र प्रसिद्ध

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. पुण्यात एक दिवसाआड महिला अन् मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येताना आपल्याला दिसत आहे. पुण्यातील बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अत्याचार करणार्‍या नराधमाची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्धीला दिली आहेत. तसेच, आरोपींबाबत काही माहिती असल्यास किंवा कोठे दिसल्यास ती माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन केले आहे.

Advertisement

बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दहा पथके तयार केली असून, त्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. अजून आरोपींचा थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, तरुणीने व तिच्या मित्रांनी सांगितलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी दोघांची रेखाचित्रे तयार केली आहेत. त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर 8691999689, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५ चे युवराज हांडे 8275200947 / 9307545045 तसेच गुन्हे शाखा 020-26122880 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page