संतापजनक! पुणे जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार

दौंड : बदलापूरमधील मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे, अकोला येथे घडलेल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात देखील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सातवी ते नववीमधील विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी विद्यालयामध्ये जात गुन्हा दाखल केला आहे. दौंड तालुक्यातील मळद मधील नवीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष भीमराव वाखारे व शिक्षक बापूराव साहेबराव धुमाळ या दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकाने विद्यार्थीनींना व्हाॅट्सअप व्हिडिओ काॅल करून त्यांचे अश्लील फोटो काढत होता. त्याआधारे तो ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. पालकांना याची माहिती मिळाताच त्यांनी विद्यालयात धाव घेत घेत या प्रकराचा जाब विचारला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा मोबाईल जप्त केला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




