पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपींचं सीसीटीव्ही फूटेज आलं समोर

पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास फिरायला मित्राबरोबर फिरायला गेलल्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असतांना आरोपींचे स्केच देखील जारी करण्यात आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. आरोपींच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. यात तिन्ही आरोपी स्पष्टपणे दिसत आहे.
नेमकी घटना काय?
एक मित्र आणि त्याची मैत्रीण गुरुवारी रात्रीच्या सुमारास बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे तीन अज्ञात तरुण आले. त्या तिघं नरधमांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीला धमकावलं. त्यांनी या मुलाला त्याचे कपडे काढून, त्याला शर्टने आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केले. या संपूर्ण घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. त्यानंतर बांधलेल्या मुलाला तिघांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करत तपास सुरू केला. त्यानंतर अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




