पंढरपूरच्या भीमा नदीतील पाणी पातळी झाली कमी, पुराचा धोका टळला

पंढरपूर : पंढरपूरच्या भीमा नदीची वाढलेली पाणी पातळी आता ओसरायला सुरुवात झाली आहे. पंढरपुरातील पाणी पातळी काल मध्यरात्रीपासून कमी होत आहे. उजनी धरणातून होत असणारा एक लाख 25 हजाराचा विसर्ग आता 50 हजारावर आला आहे. तर उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून येणारा दोन लाखाचा विसर्ग आता 25 हजारावर आलाय.
Advertisement
पंढरपुरात येणारा पाण्याचा विसर्ग कमी होऊन पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळ पर्यंत चंद्रभागेचे पाणी हे घाटाच्या खाली पात्रात जाऊन पोहोचेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पंढरपुरात असणारा पुराचा धोका आता टळला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर
Advertisement




