संतापजनक! ‘तू मला आवडतेस’, स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थीनीला मेसेज

पुणे : राज्यामध्ये सध्या मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थीनीवरील अत्याचाराचा प्रकरण ताजे असताना पुण्यात देखील संतापजनक प्रकार घडला आहे. शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेबाबत साशंकता आहे. शाळेतील विद्यार्थीनीला तिच्या स्कूल व्हॅन ड्रायव्हरने तू मला आवडतेस असा मेसेज केला आहे. या प्रकरामुळे पालकांनी रोष व्यक्त केला असून मनसेने देखील चालकाला चोप दिला आहे.

व्हॅन चालकावर गुन्हा दाखल

Advertisement

याबाबत स्कूल व्हॅन चालकावर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटना उघडकीस येताच स्कूल व्हॅन चालकाला मनसे कार्यकर्ते गणेश भोकरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी चांगलात चोप दिला. त्यानंतर त्या स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.काही दिवसांपूर्वी शाळेतील स्कूल व्हॅन चालकानं विद्यार्थिनीला ‘तू मला आवडतेस’ असा मेसेज केला होता. हा स्कूल व्हॅन चालक प्रत्यक्ष तसंच इंस्टाग्रामवर मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता, असा आरोप पालकांचा आहे.

ही घटना समोर आल्यावर पालकांनी संताप व्यक्त केला. “आम्ही तुमच्या विश्वासावर मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्य करत असाल तर विश्वास कोणावर ठेवायचा?” असा संतप्त सवाल पालकांनी विचारला.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page