नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अमरावती – वाकड्या नजरेने बघाल तर चुन चुनके मारेंगे, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी पुन्हा केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यातून त्यांनी मुस्लिमांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन धर्मात कटुता निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर करण्यात आला आहे.

Advertisement

भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या अचलपूर शहरात हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. अचलपूर शहरात नितेश राणे यांच्या उपस्थितीत अचलपूर परतवाडा शहरात बाईक रॅलीला सुरूवात करून हिंदू आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. बाईक रॅली नंतर जाहीर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अचलपूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page