पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण अपघात, 4 कामगारांचा मृत्यू

पुणे : पुण्यामधल्या काचेच्या कारखान्यात भीषण अपघात झाला आहे, या अपघातात कारखान्यात काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात येवलेवाडी भागात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात माल उतरवला जात होता, त्यावेळी काचा फुटल्याने कामगार गंभीर जखमी झाले होते. या कामगारांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण चार कामगारांचा मृत्यू झाला तर 2 कामगार गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार येवलेवाडी रस्त्यावर सीएनजी पेट्रोल पंप मागे ‘इंडिया ग्लास सोल्युशन’ नावाने काचेचा मोठा कारखाना आहे. याठिकाणी काच उतरवून घेण्याचे काम कामगार करत होते. तेव्हा मोठे काचेचे स्लाईड खाली उतरवत असताना काचेचे स्लाईडला बांधण्यात आलेला बेल्ट तुटला आणि दोन मोठे काचेचे स्लाईड या मजुरांच्या अंगावर पडले. यात अंगावरच काच पडल्याने काचेचे तुकडे अंगात घुसल्याने चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच स्थनिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




