जेवणात मिरचीचा खर्डा न केल्याने पत्नीवर चाकूने वार; येरवड्यातील धक्कादायक घटना

पुणे – पुण्यात शनिवारी रात्री जेवणाच्या ताटात हात घातल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाचं आता येरवडा येथे एका पतीने जेवणात मिरचीचा खर्डा नसल्याने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे तर सुप्रिया पंकज पाचारणे (वय ४०, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पंकज रिक्षाचालक आहे. रविवारी सायंकाळी तो घरी आला. त्याने पत्नी सुप्रिया यांना मिरचीचा खर्डा करुन देण्यास सांगितले. तेव्हा तुम्ही मिरची घेऊन या. मी खर्डा करून देते, असे सुप्रियाने सांगितले. यावरुन पंकज चिडला आणि त्यांच्या कानाखाली मारली. तेव्हा त्यांचा मुलगा आर्यनने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणला. आर्यनला मारण्यासाठी चाकू उगारला. झटापटीत सुप्रिया यांच्या डाव्या डोळ्याजवळ चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. पोलीस हवालदार तेजपाल तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




