वडिलोपार्जित मिळकतीवर अनधिकृत बांधकाम व बोगस गुंठेवारी दाखला मिळवून फसवणूक..!

तक्रार अर्ज

  • आनंद मोहन कोंढरे यांनी मे. हर्ष आनंद डेव्हलपर्स यांनी त्यांच्या वडिलोपार्जित मिळकतीवर अनधिकृत बांधकाम करून बोगस गुंठेवारी दाखला मिळवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे .
  • विकसन करारानुसार, 00 हे 02 आर मिळकत विकसनासाठी सन २०१८ साली नोंदणीकृत विकसन कराराने दिलेली होती तसेच लगतचे २ आर असे एकूण 00 हे 04 आर मिळकतीवर बांधकाम करून सदनिकाधारकांना सदनिका विकल्या गेल्या .
  • खरेदी दस्तांमध्ये गुंठेवारी कायद्यान्वये बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला जोडला, जो 2004 मधील असल्याचे निदर्शनास आले, पण पुणे महानगरपालिकेचे जावक नोंदचे तक्रार अर्ज दार यांना याबाबत माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रा वरुण सदरील गुंठेवारी दाखला देण्यात आला नसल्याची दिसून येते, असे असता सुद्धा पुणे महानगरपालिका जाणून बुजून सदरील बिल्डरला वाचवण्यासाठी वरील गुंठेवारी बोगस असल्याचे लेखी अथवा स्वता कोणतीही कारवाई करत नाही

तक्रारीनंतर घडलेल्या घटना

  • तक्रार दाखल केल्यावर बिल्डर व यांच्या भावाने धमक्या दिल्या आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर बोगस गुंठेवारी दाखला रद्द करण्याचे आश्वासन दिले .
  • तक्रार अर्ज माघारी घेतल्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि पुन्हा अर्ज दाखल केला .
  • सदरील बिल्डर यांनी पुन्हा तोंडी आश्वासन /हमी देऊन अर्ज मागे घेण्यास सांगितले, परंतु कोणतीही वचनपूर्ती न केल्याने अर्जदाराची फसवणूक झाली .

आरोपांची नोंद

Advertisement
  • स्थानिक नगरसेवक यांच्या आश्रयाने आंबेगाव भागात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे .

सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे पत्र

  • सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर कार्यालयाने दुय्यम निबंधकांना बोगस गुंठेवारी दाखल्याने फसवणूक झाल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत .
  • अर्जात नमूद केलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करून दोषी आढळल्यास नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 82 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत .
  • संबंधित कागदपत्रे बनावट आढळल्यास, दस्तामधील पक्षकार आणि गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .
  • सह जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयाच्या पत्रा नुसार दुय्यम निबंधक हवेली नं 12 यांनी दिनांक 15/05/2024 रोजी कोंढवा बुद्रुक पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.
  • सह जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयाच्या पत्रा नुसार दुय्यम निबंधक हवेली नं 2 यांनी दिनांक 5/09/2024 रोजी मार्केट यार्ड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.
  • सह जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयाच्या पत्रा नुसार दुय्यम निबंधक हवेली नं 22 यांनी दिनांक 19 /01/2025 रोजी अलंकार पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page