आता मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार; ‘असं’ झालं नियोजन

छत्रपती संभाजीनगर : राज्यात दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा, आरएसएसचा दसरा मेळावा, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. आता या दसरा मेळाव्यात आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षीपासून नारायण गडावर ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायणगडावरून रणशिंग फुंकले असून जरांगेंनी या बैठकीत तशी घोषणा केली. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




