खाऊचे आमिष दाखवून ५ वर्षीय मुलावर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

राजगुरुनगर : पुण्यात अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय मुलावर अनैसिर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विजय बाळू ताठोड ऊर्फ गोल्या (वय २४, रा. राजगुरुनगर, ता. खेड) असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव असून, खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीच्या घरासमोर पाच वर्षाचा मुलगा खेळत होता. त्याला ‘तुला खाऊ देतो’, असे सांगून संशयित आरोपीने स्वतःच्या घरात नेले आणि मुलावर जबरी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी राठोड याच्यावर बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल राजे करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




