शरद पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा योग्य नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

नागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केले.

Advertisement

शरद पवार यांच्या विधानावर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहेत, ते चांगलं नाही. जनता सुज्ञ आहे. वेगवेगळे आंदोलन तयार करून समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहित नाही’.

फडणवीस यांना विलन केलं जातंय

प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलले असतील देवेंद्र फडणवीस यांना विलन केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाच्या विषयात भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. पण लोक सुज्ञ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page