मोक्क्यातील १० महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला अटक; हडपसर पोलिसांची कारवाई

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, खून प्रकरणाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या १० महिन्यापासून फरार असलेल्या टोळी प्रमुखास पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. सुरज ऊर्फ चुस बाळू मोहिते (वय २२, रा. मार्केडेयनगर, वैदुवाडी) असे टोळीप्रमुखाचे नाव आहे.

तक्रार दिल्याच्या रागातून १५ जणांच्या टोळक्याने वैदुवाडीतील एकाच्या घरावर हल्ला करुन वाहनांची व दुकानांची तोडफोड केली होती. तसेच हातातील शस्त्राने वार करुन सुरज ऊर्फ चुस मोहिते याच्या टोळीने परिसरात दहशत माजविली होती. टोळक्याने चांगलाच गोंधळ घातला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची जानेवारी २०२४ मध्ये सुरज मोहितेसह १५ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. कारवाईतील ९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. तर ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.

Advertisement

सुरज मोहिते मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो सापडत नव्हता. त्याच्या राहत्या पत्यावर वेळोवेळी व इतर शोध घेऊनही मिळू शकत नव्हता. आरोपीविषयी कोणतीही माहिती मिळून येत नसताना हडपसर तपास पथक अधिकारी सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक आरोपीची माहिती गोळा करुन त्याला १९ सप्टेबर रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page