दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये तब्बल 11 लाखांचा गुटखा जप्त; यवत पोलीसांची कारवाई

पाटस : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरवंड येथे एका घरात पोलीसांनी छापा टाकून तब्बल ११ लाख २ हजार ६४० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून वरवंड गावच्या हद्दीत रेवणनाथ गोसावी याच्या घरासमोरील बंद खोलीमध्ये बेकायदेशीर अवैधरित्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीकरिता ठेवलेला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला असून त्या खोलीची झडती घेण्यात आली असता तेथे गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला. या छाप्यात ११ लाख २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा माल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, गुरुनाथ गायकवाड, हिरालाल खोमणे, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे, महिला अंमलदार हेमलता भोंगळे, प्रतीक्षा हांडगे यांनी केली असून या घटनेचा पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




