२४ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना कर्जत पोलिसांनी केले जेरबंद…!

प्रस्तुत बातमीतील हकिकत अशी की, फिर्यादी संतोष श्रीरंग विटकर वय ४१ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा जलालपुर ता कर्जत जि अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक २५/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०७/०० वा पुर्वी जलालपुर येथील भैरवनाथ मंदीराचे सभा मंडपामध्ये फिर्यादी यांचा भाउ नामे हनूमंत श्रीरंग विटकर वय ३५ वर्षे रा जलालपुर ता कर्जत यास कोणी तरी अज्ञात इसमाने धारदार व टणक वस्तुने डोक्यात मारुन त्याचा खुन केला आहे वगैरे फिर्यादी वरुण कर्जत पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२५ भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री. दौलतराव जाधव यांनी सुरु केला.
सदर गुन्हयाची माहीती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक श्री. दौलतराव जाधव यांनी तपासाची सुत्र वेगाने फिरवुन पोलीसांची दोन पथके तयार करुन अज्ञात आरोपींना निष्पन्न करुन शोध घेण्यासाठी रवाना केले पोलीस पथकांनी जलालपुर येथे रवाना होऊन गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाव्दारे गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करुन इसम नामे १) आदर्श नागेश तिवारी वय- २८ वर्षे २) वैभव राजु नलवडे वय २९ वर्षे दोघे रा जलालपुर ता कर्जत जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी मयताकडुन सतत होणाऱ्या शिवीगाळ व दमदाटीस कंटाळुन व दिनांक २५/०५/२०२५ रोजी पुन्हा त्याने आरोपींना आई-बहीणीवरुन शिवीगाळ केल्याच्या तात्कालिक कारणावरुन मयत भैरवनाथ मंदीरामध्ये झोपलेला असताना त्याचे डोक्यात दगड घालुन तसेच बांधकामास लागणा-या लाकडी बल्लीने डोक्यात प्रहार करुन त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपींना दिनांक २६/०५/२०२५ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. दौलतराव जाधव हे करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव, सपोनि. रमीझ मुलाणी, पोउपनि प्रदीप बोऱ्हाडे, पोउपनि बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/ मारुती काळे, पोहेकॉ / संभाजी वाबळे, पोकॉ/ किरण बोराडे, प्रताप देवकाते, प्रकाश दंदाडे, वैभव गांगर्डे, किरण जाधव, अर्जुन पोकळे, विशाल क्षिरसागर, अमोल रायकर, मनोज मुरकुटे, चापोकॉ/ दादाराम मस्के यांनी केली आहे.




