ऐन गणेशोत्सवात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, संदीप सिंह गिल्ल यांना दिली मोठी जबाबदारी

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असतानाच राज्याच्या गृह विभागाने मुंबई आणि पुण्यासाठी काही महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत पुण्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केला आहेत. त्यात, सिंघम महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांना पुण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्याती आली आहे. सध्या त्यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा पदभार होता. यांसह, संदीप सिंह गिल्ल, पंकज देशमुख, राजतिलक रोशन,निमित्त गोयल आणि विजय चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार आहे. तर, पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीण अधीक्षक पदावरुन मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, आजच गृह विभागाकडून हा बदलीचा आदेश प्राप्त झाला आहे.
6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
1 संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण)
2 पंकज देशमूख पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
3 तेजस्वी सातपुते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
4 राजतिलक रोशन सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
5 निमित गोयल पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
6 विजय चव्हाण प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




