पादचा-याचे मोबाईल हिसकावणा-या आरोपी कडुन १,९०,०००/- रुपये किंमतीचे ६ मोबाईल फोन व १ दुचाकी गाडी जप्त..!

दिनांक ०१/०५/२०२५ रोजी रात्रौ २०/०० वा चे सुमारास गुजरवाडी फाटा, महेश कदम यांचे बंगल्याजवळील गोल्डन स्क्रैप सेंन्टर या दुकानाचे पुढील बाजुचे रोडवर फिर्यादी हे फोनवर बोलत असताना दुचाकी गाडीवरील दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यापैकी गाडी चालविणारे इसमाने फिर्यादी यांना पत्ता विचारण्याचा बहाण करुन गाडीवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन चोरी केला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २३०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०४,३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पो. अंमलदार यांना मोबाईल चोरांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुजरवाडी येथे राहणारे रोहीत सुरेश कांबळे, सलमान शेख यांनी केला असल्याची बातमी मिळाली. त्यांचा शोध घेत असताना त्यातील रोहीत सुरेश कांबळे, वय १८ वर्षे ६ महीने, रा. जाधव नगर, गुजरवाडी फाटा, कात्रज, पुणे हा भारतनगर येथे मिळुन आल्याने त्याचेकडुन १,००,०००/-रुपयेची ज्युपीटर दुचाकी गाडी व ९०,०००/- रुपये किंमतीचे ६ मोबाईल जप्त केले आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन त्याचेकडुन जप्त केले मोबाईल फोन व दुचाकी गाड्यांबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




