नशेची माहिती आईला व पत्नीला देत असल्याच्या रागातून तरुणाचा खून; आरोपींना अटक

पुणे : हडपसर भागात झालेल्या तरुणाचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. नशा करत असल्याची माहिती आई आणि पत्नीला दिल्याने आरोपींनी तरुणाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसर), ज्ञानेश्वर दत्तू सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. अमोल उर्फ भावड्या मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

Advertisement

(दि. १९ सप्टेंबर) रोजी अमोल माने हा रक्ताच्या थारोळ्या पडल्याचे आढळून आले होते. यादरम्यान, अमोल रामोशी आळी परिसरात एकटाच राहत होता. तसेच तो केटरींगचे काम करत होता. रामोशी आळी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे यांनी तांत्रिक तपास सुरू केला असता त्यावरून दोघांची नावे निष्पन्न केली. त्यानूसार, वैभव याला हडपसर तर ज्ञानेश्वर याला सोलापूरमधून ताब्यात घेतले. त्यात दोघांनी मिळून मानेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, जोतीबा पवार यांनी केली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page