मराठा आंदोलकांच्या गाड्या अडवल्यावरुन मनोज जरांगे आक्रमक; मंत्र्यांना फोन करुन दिला इशारा

जालना : जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी केली. वडीगोद्री येथून मनोज जरांगे समर्थकांच्या गाड्या जात होत्या, त्यावेळी मराठा समाजाच्या गाड्या पोलिसांनी अडवून ठेवल्या होत्या, यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले.
जालन्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीत अडवलं. बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला. त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले. वडीगोद्रीत रात्री लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवलीकडे येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. 15 मिनिटात बॅरिकेटिंग काढा अन्यथा तेचं बॅरिकेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना फोन केला. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग हटवलं.
वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले. वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग काढले नाही तर मी तिथं येतो. 15 मिनिटांमध्ये बॅरिकेटिंग काढा. नाही तर तिथं येऊन सागर बंगल्यापर्यंत तेचं बॅरिकेटिंग फेकतो. तुमच्या बापाचा रस्ता आहे का अडवायला? 15 मिनिटांमध्ये गेट काढा नाही तर मी बॅरिकेटिंग काढायला येतो. देवेंद्र फडणवीसाला दंगली घडवायच्या आहेत का? उपोषणापुढे उपोषण करायला परवानगी का देता? मुख्यमंत्र्यांना फोन लावा त्याची चौकशी लावा…, असा इशारा मनोज जरांगेंनी पोलिसांना दिला.
लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांचं उपोषण स्थळ जवळच
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. तर मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषण करत आहेत. तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जमले, त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. वडीगोद्रीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




