पुणे हादरलं! अल्पवयीन मुलीवर कॉलेजमध्येच लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

पुणे: पुण्याच्या दक्षिण भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जात असून, चारही मुले एकमेकांना ओळखत नसल्याचे समोर आले आहे. या मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले आहेत.
ओम आदेश घोलप (वय २०), स्वप्नील विकास देवकर (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १६ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे. मुलगी एका नामांकित महाविद्यालयात अकरावीत आहे. एक आरोपी संबंधित महाविद्यालयात आहे. अन्य तिघे जण दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. समाज माध्यमांतून आरोपींची मुलीशी ओळख झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या होत्या. त्यांनी युवतींना महिला अत्याचार प्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा युवतीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली, तसेच समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




