पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुचं; कामगारांनी रेस्टॉरंटच्या तिजोरीतून ११ लाख रुपये पळवले

पुणे – राजा बहाद्दुर मिल्स येथील एका रेस्टॉरंटच्या तिजोरीतून कॅशियर आणि बार टेंडरचे काम करणार्या दोघांनी सव्वा आकरा लाखांची रोकड पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनीष नायर (वय ३६, रा. शेवाळवाडी हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक कुमार कृष्णा दास (वय ३३, रा. ओडीसा), प्रवंजन गणेश जेना (वय २७) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तीन दिवसापुर्वी घडली आहे. रेस्टॉरंट व्यवस्थापनाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक हा रेस्टॉरंटमध्ये कॅशियर म्हणून काम करतो. तर प्रवंजन हा बार टेंडर म्हणून करत होता. त्यामुळे दोघांना पैशांची माहिती होती. दिवसभरात झालेल्या व्यवसायाचे पैसे तिजोरीत ठेवण्यात आले होते. नेहमी प्रमाणे जमा झालेली ११ लाख २४ हजार ५६० रुपयांची रोकड तिजोरीत ठेवण्यात आली होती. परंतु, या दोघांनी रात्रीत ही रक्कम तिजोरीतून चोरून पळ काढला. पुढील तपास उपनिरीक्षक खेडकर करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




