शैक्षणिक संस्थांच्या परिसरात गांजा विकणार्या तिघांना अटक, लाखोचा मुद्देमाल हस्तगत

पुणे – पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १८ लाख रुपयांचा ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे धुळे येथून गांजा तस्करी करून पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी, अशोक गुलाबचंद पावरा आणि पवन सानू पावरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत आरोपी हे गांजा विक्री करत होते. याबाबतची माहिती अमली पदार्थ पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे त्यांच्या पथकासह हिंजवडी आणि म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना काही व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. आधी १६ किलो तर पोलिसी खाक्या दाखवताच १७ किलो गांजा आरोपींकडून जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत तब्बल १८ लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




