शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आशिष रावत (वय ४९, सध्या रा. क्रिमसन सोसायटी, पड्याळ वस्ती, ओैंध रस्ता, खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुलीच्या आजीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार महिलेची नऊ वर्षांची नात बुधवारी (१४ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेत निघाली होती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची वाट ती पाहत थांबली होती. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक रावतने शाळकरी मुलीला त्याच्या घरात नेले. तिच्याशी त्याने अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आजीला दिली. त्यानंतर रावतविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दिघे अधिक तपास करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




